महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तुफान व्हायरल, पहा फोटो…

446

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमी चर्चेत असतो. महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएल रद्द झाल्यापासून आपल्या कुटुंबासोबत घरी वेळ घालवत आहे. आयपीएल रद्द झाल्यानंतर आपल्या टीम मधील सर्व खेळाडू घरी सुखरुप पोहोचल्यानंतरच मी हॉटेल सोडणार, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. महेंद्रसिंग धोनी सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो आता मात्र तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात साक्षीसोबत लग्न करण्याअगोदर एक मुलगी होती. जिच्यावर तो खुप प्रेम करत होता. ते दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवत होते.

ते दोघे लग्न देखील करणार होते. मात्र नशिबाने त्या दोघांना वेगळे केले. दुर्दैवाने प्रियंकाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. सध्या सोशल मीडियावर धोनी व त्याच्या पहिल्या प्रेयसीचे फोटो समोर येत आहेत. यामध्ये दोघे एकत्र दिसुन येतात.

सूत्रांचे असे मत आहे की, ही दुसरी कोणी नसुन प्रियंका झा आहे. धोनीच्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यामध्ये याचा उल्लेख केला आहे. आता मात्र तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

आतापर्यंत ती कोण होती, याबाबत कोणालाही माहिती नव्हती. जेव्हा महेंद्रसिंग धोनीला समजले की प्रियंका त्याला सोडून गेली. तेव्हा तो खुप खचला होता. तो एकदम शांत झाला होता. धोनीच्या जवळील व्यक्तींचे असेही मत होते की, तो खूप दिवस क्रिकेटपासून दूर होता.

मात्र काही दिवस निघून गेल्यानंतर त्याने स्वतला सावरले आणि क्रिकेटमध्ये पुढे खूप नाव कमावले. त्याने भारतीय क्रिकेट संघाला २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकून दिला. मोठ्या संघर्षानंतर धोनी इथपर्यंत आला आहे.