“लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होत असलेली वाताहत आणि ऑनलाइन शिक्षणातील समस्या” या विषयावर व्याख्यान संपन्न.

52

 

अकोट – गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात लॉकडाऊन मुळे सतत खंड पडत आहे आणि सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे म्हणून प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी 19 मे 2021 ला 5.00 वाजता झूम या ऑनलाईन मिटींग च्या अंतर्गत “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होत असलेली वाताहत आणि ऑनलाइन शिक्षणातील समस्या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते .”
भारतात लोक 52 टक्के इंटरनेटचा वापर करतात याचा अर्थ असा आहे की , अर्धा भारत अजूनही इंटरनेटपासून दूर आहे.
ग्रामीण भागात 36 टक्के आणि शहरी भागात 64% लोक इंटरनेटचा वापर करतात. 67 टक्के पुरुष आणि त्यात 33 टक्के स्त्रिया इंटरनेटचा वापर करतात. यावरून इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारतात खूप मोठी तफावत आहे.
शिवाय भारतात 16 टक्के कुटुंबाला प्रत्येक दिवसाला एक ते आठ तास विद्युतपुरवठा मिळतो तसेच 33 टक्के कुटुंबाला प्रत्येक दिवसाला 9 ते 12 तास विद्युत पुरवठा मिळतो आणि 47 टक्के कुटुंबांना 12 तासांपेक्षा जास्त विद्युत पुरवठा मिळतो पण विद्युत पुरवठा मध्ये सुद्धा अनियमितता असते. विद्युत वितरणामध्ये सुद्धा भारतात मोठी विषमता आपल्याला बघायला मिळते.
मेडिसिन ,इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात श्रीमंत घराण्यातील मुलं शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्टफोन इंटरनेट सेवा यांचा खर्च परवडतो .त्यामुळे त्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. तसेच उच्च मध्यमवर्गीय जनतेचे मुलं सर्व सुविधायुक्त पंचतारांकित शाळांमध्ये जातात त्यामुळे त्यांचे सुद्धा ऑनलाइन एज्युकेशन चालू आहे. आज काल ऑनलाईन शिक्षण ही शहरातील श्रीमंत वर्गाची मक्तेदारी बनलेले आहे.
कष्टकऱ्यांच्या गरीब मुलांची सोबतच भटक्या विमुक्त आदिवासी आणि ग्रामीण भागातील सरकारी आणि अनुदानित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाची खूप मोठी समस्या आहे. कारण हा वर्ग असा आहे की त्यांची आर्थिक स्थिती खुप बिकट असते . कॉम्प्युटर, लॅपटॉप इंटरनेट सेवा ,स्मार्टफोन, विद्युत सेवा यांचा खर्च ते करू शकत नाहीत. म्हणजेच यांच्याकडे डिजिटल डिव्हाइसेस खूप कमी आहेत त्यामुळे या वर्गाच्या ऑनलाईन शिक्षणाच्या खूप मोठ्या समस्या समोर येत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊन ने शिक्षणव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकलेले आहे.
भारतात 15 लाख शाळा लॉकडाऊनमुळे बंद आहेत आणी उच्च शिक्षणातील 50 हजार महाविद्यालय भारतात बंद आहेत आणि ऐकुन 30 कोटी विद्यार्थी भारतात घरी बसले आहेत. हा खूप मोठा” टाईम बॉम्ब” आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे झालेले नुकसान हे कधीच भरून निघणार नाही .
अशा प्रकारची अतिशय उपयुक्त माहिती प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी आपल्या व्याख्यानातून दिली आहे. भारतीय सरकारमधील शिक्षण खात्याने या माहिती कडे विशेष लक्ष देणे विशेष गरजेचे आहे.