भाजपातर्फे उद्या वणीत चक्काजाम आंदोलन

401

वणी : परशुराम पोटे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने कुठलीही ठोस मदत केलेली नाही. राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आलेला आहे. मा.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिल्या गेले, मात्र आपण ते सत्तेवर येताच बंद केले. शिवाय आतातर दुधाचे दर देखील खालावले आहेत. मात्र सरकारने या विषयाची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजाने आता रस्त्यावर उतरून आम्ही मागणी करणार आहोत की,गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे,दूध भूकटि निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे,
दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये करावे,विद्युत दरवाढ कमी करावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे,
शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात देण्यात यावा.युरियाची कृत्रिम टंचाई दूर करावी, काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी.वरील सर्व मागण्या मान्य कराव्या व जनतेला होणारा त्रास कमी करावा
ईत्यादी मागणी करीता आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती भाजपाचे वणी तालुका अध्यक्ष गजानन विधाते यांनी दिली.