शिवनी खुर्द येथे रान कुत्र्याच्या हल्ल्यात गाय ठार

273

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

शिवनी खुर्द:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी गटग्रामपंचायत मधील शिवनी (खुर्द) येथे दिनांक 23/5/2021रोजी कुत्र्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली.

प्राप्त माहितीनुसार दिनांक 21/5/2021रोजी सकाळी 7.00 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे गायीचा मालक विनायक टेंभुर्णे यांनी गाईला चारा चारण्यासाठी मोकळे सोडले होते .ती गाय चारा शिवनी (खुर्द) लगतच्या तलावांमध्ये चरण्यासाठी गेली असताना त्या गायीवर जंगलातील रानकुत्रे यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते .अशा गंभीर अवस्थेत त्या गाईला घरी आणून पशुवैद्यकीय कर्मचारी तर्फे उपचार करण्यात आला. परंतु उपचाराअंती आज दिनांक 23 /5/2021 रोजी त्या गाईने आपला प्राण सोडला.

त्यामुळे गाई मालकावर आर्थिक संकट ओढवले आहे. तरी वन विभागाने या गाईचा पंचनामा करून गाई मालकाला दहा हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.