वडेगाव, दवंडी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील उघडल्यावर असलेल्या धानाची तात्काळ उचल करा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी.

48

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

आरमोरी – तालुक्यातील वडेगाव व दवडी येथे आदिवासी विकास महामंडळ च्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अंतर्गत उघडल्यावर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करुन मोठ्या प्रमाणात पावसाळी धान खरेदी करण्यात आले परंतु पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही शासनाने उघडल्यावर असलेल्या धानाची उचल केली नाही त्यामुळे वेळेवर उचल न केल्यास पावसाच्या पाण्यात धान भिजुन मोठ्या प्रमाणावर शासनाची नुकसान होऊ शकते त्यामुळे शासनाने लवकरात लवकर वडेगाव व दवडी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील उघडल्यावर असलेल्या धानाची उचल करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात शेतकऱ्यांना धान विक्री साठी सोयीस्कर व चांगली धान पिकांना किंमत मिळावी या उद्देशाने शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करुण पावसाळी हंगामातील धान आरमोरी तालुक्यातील वडेगाव व दवडी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघडल्यावर खरेदी करण्यात आले परंतु धानाची उचल न केल्याने पावसाळ्याच्या दिवसात पाऊस आल्यास वाहतूक करणाऱ्या गाड्याच त्या ठिकाणी जाऊ शकत नसल्याने धान भिजुन शासनाची लाखो रुपयांची नुकसान होऊ शकते. यासंबंधी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सागुनही उचल केली नाही धान खरेदीत तूट आल्यास बिनाकारण संस्थेलाच दोषी ठरऊन कमिशन मधुन तूटची भरपाई कापली जातो असल्यामुळे शासनाने प्रथम पावसाळ्याच्या दिवसात धान उचलण्यासाठी वाहण जात नाही असे वडेगाव व दवडी येथील शेतालगत खोल व पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या जागेत उघडल्यावर असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धानाची तात्काळ उचल करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.