नगर पालिका कर्मचारी मारोती मडकाम(मामा) सह दोन कर्मचार्यांचा सेवानिवृत्त निरोप सोहळा संपन्न

 

वणी : परशुराम पोटे

वणी नगर पालिकेत कार्यरत असलेले जलपुर्ती विभागाचे कर्मचारी मारोती परसराम मडकाम(मामा),यांचेसह राजु जयस्वाल व श्रीमती शांताबाई दुर्गे हे तिन कर्मचारी दि. ३१ जुलै 2020 रोजी नगर पालिकेच्या सेवेतुन निवृत्त झाले, त्या निमीत्य तिनही निवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळा अाज दूपारी ४ वाजताचे सूमारास सोशल डिस्टंसिंग चे पालन करुन,नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या कार्यालयात त्यांचेच अध्येक्षतेत घेण्यात आला.
यावेळी नगर सेवक धनराज भोंगळे, यांचेसह नगर पालीकेचे सामान्य प्रषासन अधिकारी विजय महाकुलकर, जलपुर्ती अभियंता शुभम तायडे, नियोजन राहुल चौधरी,जयश गायकवाड,बांधकाम दहेकर,धम्मरत्न पाटील, यांचेसह सुभाष आवारी,महेश पारखी व कर्मचारी यांचे उपस्थितीत शाल श्रिफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात अाला.
यावेळी नियोजन विभागाचे जयंता सोनटक्के यांनी आपल्या मनोगतात जलपुर्ती विभागाचे निव्रुत्त कर्मचारी मारोती मडकाम यांचेकडे पाणी पुरवठ्याचे काम असल्यामुळे हे काम सर्वात जबाबदारीचे काम त्यांनी ३८ वर्ष सांभाळली.कारण वणी शहराची लोकसंख्या एक लाखाच्यावर असुन सर्वात म्हत्वाचे म्हणजे मनुष्याला सर्वात गरजु वस्तु असेल तर ते पाणीच आहे.आणी मडकाम मामाने वणीकरांना पाणी पाजण्याचे सर्वात मोठे पुण्याचे काम त्यांनी सांभाळले असल्याचे व्यक्त केले.तर नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.