रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना पॉझिटिव्ह काही नवीन कोरोनाबाधित क्षेत्र जाहीर

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी: रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ५२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या १८२६ इतकी झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी ११, खेड ०९ , चिपळूण १८, दापोली ०५, गुहागर ०९ रत्नागिरी शहर, तालुक्यातील काही कोरोनाबाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले, शहर आणि तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाबाधित क्षेत्रांची संख्याही वाढत आहे. आज झापडेकर चाळ, हिलटॉप अर्पाटमेंट, शिवाजीनगर, किर्तीनगर, गोडबोले स्टॉप, वैभवनगर अपार्टमेंट आंबेडकरवाडी, हॉटेल लँडमार्क जवळ थिबापॅलेस रोड, मौजे गणेशगुळे, शिंदेवाडी, मौजे नाचणे, संभाजीनगर, टीआरपी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

*दखल न्यूज भारत*