कामथे रुग्णालय करीता दोन कोटींचा निधी द्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना . रामदास आठवले यांच्याकडे मागणी कामथे रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळण्याकरीता रामशेठ रेडीज,शहानवाज शहा,संदेश मोहिते यांचा पुढाकार.

47

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : कामथे रुग्णालयास सुविधांकरीता दोन कोटींचा निधी द्या आणि आपल्या खासदार फंडातून विशेष निधी द्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्याकडे चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते रामशेठ रेडीज,शहानवाज शहा,सिद्धेश लाड,मनोज जाधव आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते यांनी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील विविध प्रकारच्या गैरसोई बद्दल चिपळूण मधील सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन येथे येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्याकरीता पुढाकार घेतला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळ नुकसानी ची पाहणी दौरा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे दिवंगत नेते रजनिकांत जाधव यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेटी करीता आलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले गुरुवारी सायंकाळी उशिरा चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आले होते या वेळी चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन कामथे उपजिल्हा रुग्णालयास केंद्र सरकार कडून तातडीने दोन कोटी रुपये आणि खासदार फंडातून विशेष निधी द्यावा या मागणीचे खा. आठवले यांना निवेदन दिले.
कामथे रुग्णालयात सध्या १३० हुन अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत कोरोना काळातही आणि या पूर्वीही येथे अनेक गैरसोयी मुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले आहेत गोर गरीब नागरीक मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी येथे दाखल होतात परंतु दरदिवशी काहींना काहीतरी उपलब्ध नसते कधी डॉक्टर हजर नाहीत,कधी एक्सरे मशीन बंद,कधी लॅब बंद ,स्वछता नाही,नर्सेस उपलब्द नाही,पाण्याची गैरसोय अशाप्रकारच्या असंख्य गोष्टीची असलेली कमतरता या मुळे गोर गरीब रुग्ण अक्षरशः मेथाकुटीला येतो या सर्व प्रकरणाची गंभीर दखल चिपळूण मधील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यानी घेतली आहे.या करिता गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर आलेले ना.आठवले यांच्याकडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते ,रामशेठ रेडीज,सिद्धेश लाड,मनोज जाधव,शहानवाज शहा यांनी दोन कोटीच्या निधीची मागणी करून येथील गैरसोईबाबत संपूर्ण परिस्थितीचे कथन केले.या वेळी ना.आठवले यांच्याकडे कामथे कुटिर रुग्णालयास विशेष बाब म्हणून हे रुग्णालय अद्यावत केले जावे येथे सिटी स्कॅन व सोनोग्राफी मशिन तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची निवासाची व्यवस्था करता यावी या आणि अशा मुख्य अनेक मागण्या करण्यात आल्या मला सविस्तर अंदाजपत्रकासहित प्रस्ताव द्या राज्य सरकार कडूनही माझ्याकडे प्रस्ताव यावा मी केंद्राकडून निधी मिळवून देईन असे रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.या वेळी नगरसेवक आशिष खातू,सुभाष मोहिते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : केद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, शाहनवाज शाह ,रामशेठ रेडिज, सिद्धेश लाड,मनोज जाधव छायाचित्रात दिसत आहेत(छाया: ओंकार रेळेकर)

दखल न्यूज भारत