रिलायन्स गृपतर्फे भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेला प्रतीदिन 50 लीटर पेट्रोल डिझेल मोफत

38

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

भंडारा-कोरोणा चे वाढते संक्रमण लक्षात घेता एक सामाजिक उपक्रम म्हणून रिलायन्स ग्रुप तर्फे भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता रुग्णवाहिकेला प्रति दिन ५० लिटर पेट्रोल/डिझेल मोफत देण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने आज या उपक्रमाचे शुभारंभ आमदार डॉ परिणयजी फुके व खासदार श्री सुनीलजी मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ परिणयजी फुके यांनी रिलायन्स ग्रुप चे सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले.

यावेळी श्री चंद्रप्रकाश दुरुगकर, श्री विनोद बांते, श्री संजय कुंभलकर, डॉ गोपाल व्यास, डॉ रामटेके मॅडम, डॉ निखिल डोकरीमारे, एस डी ओ राठोड सर, तहसीलदार श्री पोयाम, तिलकजी वैद्य, डॉ सुलभ रहांगडाले, श्री अरविंदजी भालाधारे, नीलकंठजी कायते, डॉ रुपेश दुरुगकर, श्री बबलूजी आतिलकर, श्री उमेशजी लोहकरे, अस्मिता वासनिक, श्री गुणवंत पुडके, श्री लोकेश गभने, श्री शुभम चौधरी उपस्थित होते.