ब्रेकिंग न्युज, अखेर, प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन, अमृत भवन चौकात खुलेआम दारू चा भरला बाजार, प्रशासन कारवाई करणार काय? जनतेचा सवाल

299

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्ह्यात टाळेबंदी व संचारबंदीचे कडक निर्बंध लागू अतांना मात्र वणी मध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण दारु विक्रेत्यांना घरपोच(होम डिलेवरी)चे आदेश असतांना मात्र दारुच्या (वाईन शॉप) दुकानात किंवा दुकानाबाहेर दारुची खुलेआम दारू विक्री करण्यात येत आहे.दरम्यान आज दि.२२ मे ला सकाळी ७ वाजता पासुनच येथिल दारुबंदी विभागाच्या नाकावर टिच्चुन शॉम टॉकीज जवळील अमृत भवन,डॉ.अब्दुल हमीद चौकात खुलेआम गर्दी करुन व भर रस्त्याने दारुच्या पेट्या आणुन दारु विक्रीचा बाजार भरला आहे. विशेष म्हणजे हा बाजार १५ दिवसापासुन सुरु असुन सुद्धा प्रशासन कारवाई का करत नाही? असा सवाल जनता करित आहेत.