कोरोणा पेशंट विषयी अफवा पसरविणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल – डॉ. सुप्रिया राठोड,मुख्याधिकारी

176

 

तालुका प्रतिनिधि:- अमान क़ुरैशी
8275553131

सिंन्देवाही नगरपंचायत क्षेत्रात सहा कोरोणा पॉझेटिव्ह रुग्न निघाल्याने शहरभर चर्चा सुरु आहे. परंतु पॉझेटिव्ह रुग्न कोणत्याही नागरिकांच्या संपर्कात आले नसुन ते संस्थात्मक विलगिकरणात होते. ज्या प्रभागातले पॉझेटिव्ह निघालेत तो क्षेत्र सिल करण्यात आले असुन त्या क्षेत्रात नेहमी सेनेटॉयझरची फवारणी करण्यात आहे.तसेच रोज नागरिकांच्या आरोग्याची सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जावु नये. आणि आरोग्य विषयी कोणतेही लक्षणे आढळुन आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला माहीती द्यावी.
कोरोना पेशंट विषयी चुकीची माहीती पसरविणाऱ्यांवर पोलीस कार्यवाही करण्यात येणार आहे .
शासन नियमाने सर्व व्यवसाईकांना जो वेळ ठरवुन दिला आहे त्या वेळेतच दुकाने उघडुन बंद करावेत अन्यथा सक्तीची कार्यवाही करण्यात येईल अशी माहीती नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे.