नवीन इमारत बांधकामासाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर नानाभाऊ पटोले यांचा पुढाकार : लाखांदूर पंचायत समिती इमारतीचे बांधकाम

42

प्रतिनिधी:- नंददत्त डेकाटे

लाखांदूर : लाखांदूर येथे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत जीर्ण होऊन मोडकडीच येण्याच्या अवस्थेत आल्याने गत काही वर्षांपासून नवीन इमारत बांधकामाची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकारात ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नवीन इमारत बांधकामासाठी तब्बल ९ कोटी५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लाखांदूर येथे पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे या इमारतीचे मागील काही वर्षांत अनेकदा दुरुस्ती कामदेखील करण्यात आली आहेत. मात्र इमारतीस तब्बल ५० वर्षाहून अधिक काळ लोटला असल्याने ही इमारत पूर्णतः जीर्ण व मोडकळीस आली आहे. या परिस्थितीत या इमारतीत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय कामे करित असल्याने भविष्यात इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे मोठा धोका होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली जात आहे हा धोका लक्षात घेता गत काही वर्षांपूर्व वर्षांपासून स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील नागरिकांनी पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामाची शासनाकडे मागणी लावून धरली होती या मागणीची दखल घेत साकोली चे आमदार तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकारात ग्रामविकास विभागाने ९कोटी ५४ लाख ३०हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे या मंजुरीअर्तगत स्थानिक लाखांदूर येथील पंचायत समिती परिसरातील गट क्रमांक २६७ मध्ये ९९५.८१ चौ. मी. जागेत बांधकाम केले जाणार आहे