सुविधा कापड केंद्रावर धाड, दुकान सिल करुन ५० हजाराचा दंड ठोठावला, नगर पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

63

 

वणी :- परशुराम पोटे

लॉकडाऊन च्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या एका बड्या कापड दुकानावर कारवाई करत, दुकान सिल करुन ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हि धडाकेबाज कारवाई आज दि.२१ मे ला दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास मुख्यधिकारी रविन्द्र कापशीकर व पोलीस पथकाने केली आहे.
टाळेबंदी व संचारबंदीमुळे जिल्हा प्रशासनाने आस्थापणा बाबत नियमावली जाहीर केली असुन १ जून पर्यंत दुकाने बंद चे आदेश देण्यात आले आहे.
तरी सुद्धा व्यावसायिक आपली दुकाने उघडून व्यवसाय करतांना दिसत आहे. आर्थीक हव्यासापोटी शटर बंद दुकाने सुरु असा उपद्व्याप दुकान व्यावसायिकांचा सुरू आहे. दरम्यान आज दि.२१ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरातील मध्यभागी असलेल्या मोठी कमाणी चौक जवळील सुविधा कापड केंद्र सुरु असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाला मिळताच पथकाने सदर दुकानावर धाड टाकुन दुकान सिल केले व दुकान मालक प्रशांत गुंडावार यांचेकडून ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईने मात्र शहरातील बड्या व्यावसायिकांच्या मणात धडकी बसली आहे.
सदर कारवाई नगर पालिकेचे मुख्यधिकारी रविन्द्र कापशीकर, शंतनु चिल्लार,धम्मरत्न पाटील, डिबी पथकाचे पोउनि/ गोपाल जाधव व पोलीस पथकाने केली आहे.