वैरागड येथे नाली उपसा काम अंतिम चरणात.

172

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील मजुरा मार्फत नाली उपसा काम युद्धपातळीवर आणि तेज गतीने सुरू असून अंतिम चरणात आला आहे.
आरमोरी तालुक्यात वैरागड, पाठनवाडा आणि मेंढेबोडी मिळून वैरागड गट ग्रामपंचाय मोठी आहे. तेरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत पाच वॉर्ड आहेत. या पाचही वॉर्डात नाल्यांचे जाळे पसरलेले आहे. नालीत पाण्याचे आणि घाणीचे साम्राज्य वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. तसेच कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी नाली उपसा करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे ग्रामपंचायत वतीने पावसाळ्या पूर्वी युद्धपातळीवर नाली उपसा काम सुरू केले. यामुळे गावातील मुजुरांना काम मिळून त्यांच्या उदार-निर्वाहिताचा प्रश्न सुटत आहे. नाली सफाईमुळे घाण आणि पाणी साचण्याचे प्रमाण कमी होणार आणि नागरिकांचे आरोग्य बाधित राहील. आरोग्याच्या दृष्टीने गावात पावसाळ्या पूर्वीच युद्धपातळीवर नाली उपसा काम अंतिम चरणात आल्याने नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावात होत असलेल्या नाली सफाई कामावर ग्रामपंचायत सरपंच्या संगीता पेंदाम, उप सरपंच भास्कर बोडणे, सदस्य सत्यदास आत्राम, आदेश आकरे, चंद्रवीलास तागडे, छानू मानकर, रेखा भैसरे, गौरी सोमनानी, संगीता मेश्राम, दिपाली ढेंगरे, शीतल सोमनानी, मनीषा खरवडे, प्रतिभा बनकर लक्ष देऊन आहे.