नवरगाव येथे कोविड जनजागृति सभेचे आयोजन

61

 

धानोरा ता.प्रतिनिधी
आज दिनांक 21/5/2021ला ग्रामपंचायत नवरगाव येथील सभागृहात कोविड 19 विषयी कोरोना पासून बचाव करण्यासाठी जनजागृतीसाठी सभा कपील मोतीराम कोवा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी12 वाजता घेण्यात आली ,सभेला मार्गदर्शक म्हणून श्री वामनराव राऊत, शाखा अभियंता तथा झोनल अधिकारी 19 महागु वाडगुरे पंचायत समिती सदस्य धानोरा जयेंद्र आतला, सुनीता वाडगुरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व आशा वर्क, बाजीराव नरोटे ,सर्व चारही गावाचे पोलीस पाटील, ग्रामसभा पदाधिकारी, कोरोना गाव कृती समितीचे सदस्य, रोजगार सेवक, सर्व कृषी मित्र व प्रतिष्ठित नागरिक हजर होते, सभेचे प्रास्ताविक, मार्गदर्शन व आभार श्री खुशाल नेवारे सचिव यांनी केले व कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाचे पूर्ण नियम पाळावे व लसीकरण करावे असे आव्हान श्री कपील कोवा, सरपंच यानी केले