अहेरी पोलीसांचे धाड मोहीम; विना मास्क दुकानदारांवर दंड –

130

 

रमेश बामनकर//अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारची नियमावली जाहीर केली आहे.

जीवनावश्यक वस्तू विकण्यास दुकानाचा वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असतील पण मास्क व सुरक्षित अंतर ठेवून विक्री करण्यात यावे असे नियम असतांना देखील अहेरी येथील बाजारवाडीत भाजीपाला दुकानदार या नियमांचा उल्लंघन करतांना पोलीस प्रशासनाचा निदर्शनास आले.

त्यावेळी अनेक दुकानदारांवर विना मास्क विक्री करतांना पकडले असून त्यांच्यावर दंड वसूल करण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांचा नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.