सर्वसामान्य रुग्णांसाठी आशावादी ठरत आहे एसएमएस हॉस्पिटल डॉ.परमेश्वर गौड स्वतः लक्ष देऊन चार कोविड सेंटर मध्ये करीत आहेत रुग्णांवर यशस्वी उपचार.

109

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख, दापोली,खेड,लोटे येथील एसएमएस हॉस्पिटल चे कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णसाठी आशेचे किरण ठरत आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णांवर एसएमएस हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.परमेश्वर गौड स्वतः विशेष लक्ष ठेऊन कोविड सेंटर मधील डॉक्टरांना मार्गदर्शन करीत आहेत. रुग्ण ही बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे . असंख्य रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या एसएमएस हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्सेस आणि व्यवस्थापकीय मंडळी खरे कोविड योद्धा आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एसएमएस हॉस्पिटल च्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही कोविड सेंटर मध्ये आम्ही शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकापेक्षाही सवलती च्या दरात कोरोना रुग्णांना उपचार देत आहोत हे सांगताना मातृमंदिर संस्था देवरुख कोविड सेंटर ला आम्ही माफक दरात बेड उपलब्ध करून दिले आहेत कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता त्यांना एसएमएस हॉस्पिटल तर्फे परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी माहिती एसएमएस हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.परमेश्वर गौड यांनी आमच्या प्रतिनिधीनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलतांना सांगितले.
आमच्या येथे कोणत्याही प्रकारे रुग्णांची परवड होणार नाही असे सांगताना एखाद्या कोविड सेंटरमध्ये बिलाविषयी काही गैरसमज असेल तरीही तेथील डॉक्टरांशी माझ्याशी संपर्क करा शंकांचे निरासन केले जाईल असे डॉ.गौड म्हणाले चिपळूण शहरातील प्रसिद्ध एसएमएस हॉस्पिटल च्या जिल्हयातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये दिले जाणारे उपचार आणि आपुलकीची सेवा या मुळे पाचही सेंटर मध्ये कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाण वाढले आहे,गरीब ,गरजवंत आणि बेवारस असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये अनेकवेळा मोफत उपचार करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत कोविड सेंटर मध्ये डॉ.परमेश्वर गौड आणि डॉ.सरगुरोह दापोली यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जात आहेत.कोरोना संकट काळात डॉ.गौड कोरोना योद्धा सारखे काम करीत आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादूरर्भाव अधिक आहे.कोरोना काळात या रोगाला जनतेने घाबरून जाण्यासारखे काहीच कारण नाही सर्दी, जुलाब,पोटदुखी,शौचालय साफ न होणे,डोक दुःखी,किरकोळ ताप,अंगदुखी,अंग जड होणे अशा प्रकारची किरकोळ स्वरूपाची लक्षणे आढळल्यास शासनाच्या नियमांचे पालन करीत सुरवातीलाच कोरोना टेस्ट करून उपचार घेतल्यास नक्कीच पुढचा धोका टाळता येईल असे डॉ .गौड म्हणाले.काही वर्षांपूर्वी चिपळूण शहरात बुरुमतळी येथे एसएमएस हॉस्पिटल रुग्णाच्या सेवेत दाखल झाले लोकाआग्रहास्तव पुढे हॉस्पिटल ची व्याप्ती वाढली खेड,दापोली,देवरुख आणि सोमवार दि.१० मे रोजी शुभारंभ झालेले घाणेकुंट येथील हॉटेल वक्रतुंड कोविड सेंटर या चार ठिकाणी शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियमावली प्रमाणे कोविड सेंटर सुरू आहेत, अनुभवी तज्ञ डॉक्टर ,नर्सेस, वॉर्ड बॉय या सह स्वच्छतेची काळजी घेणारे कर्मचाऱ्यांची फौंज तैनात आहे. दापोली कोविड सेंटर मध्ये २० बेड, खेडला २० बेड ,देवरुखला ३० बेडची,लोटे हॉटेल वक्रतुंड येथे ३० बेड आदी सुविधा कार्यान्वित आहेत,कोरोना पहिल्या लाटेच्या वेळी लोटे येथे वक्रतुंड हॉटेल मध्ये एसएमएस हॉस्पिटल च्या माध्यमातून कोविड सेंटर आम्ही चालवले असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार ही झाले आता सेंटर सुरू करण्या बाबत पुन्हा येथील ग्रामस्थ मंडळींची मागणी होती परंतु पुन्हा येथे सुरू करतांना आर्थिक अडचणी होत्या या काळात लोटे येथील सुप्रिया लाईफसेन्सचे मुख्य मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सतीश वाघ यांनी दानशूरपणा दाखवत मोठे आर्थिक सहकार्य केले शिवाय आमदार भास्करराव जाधव यांनी ही प्रशासकीय मान्यता मिळविणे आणि अनेक प्रकारचे सहकार्य केले हिंदुस्थान युनिलिव्हर,लोटे एमआयडीसी असोसिएशन आणि विविध कंपन्या सर्व पक्षाची राजकीय मंडळी स्थानिक ग्रामस्थ यांचे आम्हाला मौलाचे सहकार्य मिळाले असल्याचे डॉ . परमेश्वर गौड यांनी सांगितले.नव्याने लोटे येथे वक्रतुंड हॉटेल मध्ये सुरू झालेल्या कोविड सेंटर मध्ये सध्या व्हेंटिलेटर बेड ची सर्वत्र आवश्यकता भासत आहे हे आम्ही लक्षात घेऊन येथे २० बेड चे अद्यायवत असे आयसीयू ६ बेड ला व्हेंटिलेटर आणि १० बेड ला बिपन मशीन ,बेन सर्किट बाय पँप मशीन आहेत उर्वरित बेड ला ब्रेंचसर्किट बेड केले आहेत तर १० ऑक्सिजन बेड ठेवले आहेत गरज वाटली तर येथे बेडची क्षमता वाढविणे शक्य आहे .आमच्या कोविड सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णांना नेमकी कुठल्या गोष्टीची गरज आहे हे ओळखुन आम्ही चारही कोविड सेंटर मध्ये काम पाहत आहोत असे डॉ.गौड म्हणाले. दापोली येथे डॉ.सरगुरोह हे खान बहादूर मेमोरियल हॉस्पिटल केळस्कर नाका येथे उपचार करतात 8552969171, खेड बहार कॉम्प्लेक्स भरणे नाका 7218877070 लोटे हॉटेल वक्रतुंड 7370798674 देवरुख मातृमंदिर 02354 260026,7798241390 येथे संपर्क साधावा असे आवाहन एसएमएस हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.

*दखल न्यूज भारत*