महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गडचिरोली कार्यालयाचा अजब प्रताप काहीही चोरा तुमच्यावर होणार नाही गुन्हा दाखल,पोलीस स्टेशन ला करतील फक्त विनंती चोरांना वाचविण्याची जबरदस्त युक्ती माहितीच्या अधिकारात झाली माहिती प्राप्त

110

 

मिनार खोब्रागडे/येवली

गडचिरोली : गडचिरोली पासून 12 किमी अंतरावर असलेल्या येवली गावात लॉकडाऊन च्या काळात दिनांक 14 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांच्या मालकीचे साधारणतः 20 ते 25 फूट लांबीचे साधारणतः 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे विजेचे खांब चोरून प्रशस्त गोडाऊन बांधकाम करण्यात आले.सदरचे वृत्त ऑल इंडिया आरटीआय न्यूज नेटवर्क ने प्रकाशित केले होते.सदर चोरीच्या प्रकाराला जवळपास 3 महिन्याचा कालावधी उलटूनही चोरी करणाऱ्या व्यक्तीवर अजूनही महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी द्वारे कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
माहितीचा अधिकार कार्यकर्ते मिनार खोब्रागडे यांच्याद्वारे सदर प्रकरणाची माहिती मागविण्यात आली असता सदर धक्कादायक बाबीचा खुलासा झाला.इतका मोठा चोरीचा प्रकार घडूनही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा चोरी करण्याऱ्या व्यक्तिवर दाखल केला नसून फक्त एक साधा विनंती अर्ज पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्याकडे दिलेला आहे तसेच चोरी करण्याऱ्या व्यक्तीला वाचवीण्यासाठी साधारणतः 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल फक्त काही हजार रुपयांचा दाखविण्यात आलेला आहे.आणि एक चौकशी समिती गठन करण्यात आल्याचे सांगून सदर प्रकरणावर पडदा पांघरन्याचे काम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गडचिरोली कार्यालयाद्वारे द्वारे करण्यात येत आहे.सदर प्रकारात अधिकारी वर्ग आणि चोरी करणारे व्यक्ती यांच्यात साटेलोटे झाले की काय अशी शंका निर्माण होत आहे.त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गडचिरोली च्या मालकीची काहीही वस्तू चोरा आणि साटेलोटे करून मोकळे व्हा असा प्रकार कार्यालयाद्वारे करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.