अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तेदुपता मजुराला आथिर्क मदत द्या गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांच्या कडे निवेदनातून मागणी

47

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी: तालुक्यातील सालमारा येथील मंजुर गावालगत असलेल्या जंगल परीसरात तेदुपता संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जंगलातील अस्वलानी हल्लाकरुण मोठ्या प्रमाणात जखमी केले यात एक डोळा गमवावा लागला असतानाही बराच कालावधी होऊन आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे जखमी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे वनविभागाने तात्काळ अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तेदुपता मजुराला आथिर्क मदत देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा ग्रामपंचायत हदीत असलेल्या सालमारा येथील अल्पभूधारक गरीब मजूर सदाशिव गिरमा घरत याची परस्थिती हालाकाची व करता घरातला कृटुब प्रमुख असल्यामुळे कोरोना काळात कोणतेही रोजगार उपलब्ध नसल्याने कटीन परस्थितीचा सामना करण्यासाठी वर्षातुन एकदाच येणाऱ्या तेदुपत्ता संकलन करण्यासाठी दि ९ मेला सकाळी ७ वाजता च्या सुमारास गावालगत असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेले असता अस्वलाने हल्ला करुन मोठ्या प्रमाणावर जखमी केले. यांत एक डोळा गमवावा लागला असतानाही जवळपास अकरा दिवस झाले परंतु वनविभागाच्या वतीने अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तेदुपता मजुराला एक रुपयाचीही मदत न मिळाल्याने त्याचे कृटुब आथीक अडचनित आल्याची माहिती कृटुबीयाच्या नातेवाईकांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांना दिली असता यांची दखल घेऊन तेदुपता संकलन करणाऱ्या जखमी मंजुराची भेट घेऊन समस्या जाणुन वनपरिक्षेत्र अधिकारी डोगरवार आरमोरी यांच्या कडे अस्वलाच्या हल्ल्यात सालमारा येथील जखमी झालेल्या तेदुपता संकलन करणाऱ्या मजुराला आथिर्क मदत द्या
अंशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.