मागासवर्गीयांच्या नौकऱ्या मधील पदौन्नतीचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष मा.आमदार आनंदराव गेडाम यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून मागणी.

36

 

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली- अनुसुचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांमध्ये गरीबीचे प्रमाण जास्त असुन आथिर्क व शैक्षणिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागासलेपणा असल्याने त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत भारतिय राज्य घटनेमध्ये अनुसुचित जाती. जमाती व इतर मागासवर्गीयांना शासकीय नौकऱ्या मध्ये आरक्षणात पदोन्नतीची सुध्दा तरतूद केली आहे.व त्यानुसार महाराष्ट्रामध्ये शासकीय नौकऱ्यामध्ये अनुसुचित जाती अनुसुचित व ओबीसींच्या लोकांना पदोन्नती देणे बाबत आरक्षणाचे धोरण कायम ठेवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.