गोंदियात पुन्हा १४ कोरोना बाधितांची भर,बाधितांची संख्या तिनशेच्या उंबरठ्यावर क्रियाशील रुग्णांचे अर्धशतक,आतापर्यंत २९३ कोरोना पॉझिटिव्ह

 

प्रतिनिधी: बिंबिसार शहारे

गोंदिया दि.३१/०७/२०२०:
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने वाढतांना दिसत आहे. आज पुन्हा नव्या १४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांचे अर्धशतक होऊन ही संख्या ५५ वर पोहचली आहे. तर गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील उपचारातून बरा होऊन घरी परतला आहे. वाढत्या बाधितांच्या आकड्यावरून त्रिशतकाजवळ जाऊन पोहचली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण २९३ झाले आहे. २२९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
आज जे १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यात तिरोडा तालुक्यातील ओमान येथून आलेल्या आठ व्यक्तींचा समावेश आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात वडेगाव येथील दोन व खोडशिवणी येथील रुग्ण हा नवेगाव बांध येथे भरती असल्याने रुग्ण संख्या तीन रुग्ण आढळून आले, यामध्ये दोन रुग्ण ओरिसा येथून तर एक रुग्ण हैद्राबाद येथून आलेला आहे. गोंदियाजवळील कुडवा येथील एक रुग्ण आहे. एक रुग्ण हा सालेकसा येथील असून तो रायगड येथून आलेला आहे. या बाधित रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २९३ झाली आहे. तर ५५ रुग्ण हे क्रियाशील आहेत.
आतापर्यंत जिल्ह्याच्या बाहेर चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यात नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगलोर येथे बाधित आढळून आला आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आढळलेले चार, प्रयोगशाळेतून २८१ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून आठ असे एकूण २९३ बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे.
जिल्ह्यात जे बाधित असण्याची शक्यता आहे अशा रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील १९३८ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १९३० अहवाल निगेटिव्ह तर ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
संस्थात्मक विलगिकरण कक्षात २२४ आणि गृह विलगिकरणात ९८५ असे एकूण १२०९ व्यक्ती विलगिकरणात आहे.हे सर्व जण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने १८८ चमू आणि ७२ सुपरवायझरची ४२ कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे. कंटेंटमेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब, आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात ४२ क्रियाशील कॅटेंटमेंट झोन आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपुर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन, कुडवा, सालेकसा तालुक्यातील पाथरी, पाउलदौना, शारदानगर, रामाटोला व तितेपार, देवरी तालुकयातील देवरी येथील वार्ड क्रमांक ५,८,९,१० आणि १६, आखरीटोला, गरवारटोली, सडक/अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा, गोरेगाव तालुक्यातील भडंगा, डवा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील सुभाष वार्ड, विर वामनराव चौक, भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वार्ड, किल्ला वार्ड, नेहरू वार्ड, गराडा, बेरडीपार, बेलाटी/खुर्द, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी तसेच वडेगाव रेल्वे आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आदी गाव आणि वार्डचा या कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहून काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, तेव्हाच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.