इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी उजनीचे पाणी मंजूर झालेले तेच रद्द केल्याच्या निषेधार्थ,बावडा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको.  —::एक तास अकलूज-इंदापूर रस्ता या भागातील शेतकऱ्यांनी रोखून धरला::—

277

 

निरा नरसिंहपूर दि: २१ प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार,

महाराष्ट्र  राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रेय (मामा) भरणे यांचे प्रयत्नांमुळे इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५ टीएमसी सांडपाणी नुकतेच मंजूर करण्यात आले होते,त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले,परंतु अनपेक्षितपणे २ दिवसांपूर्वी हा निर्णय रद्द करण्यात आला .याचे तीव्र पडसाद आज बावडा गावामध्ये उमटले.या  परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष  हनुमंत-कोकाटे पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयबापू घोगरे,जेष्ठ नेते दत्तात्रय (मामा) घोगरे,जलतज्ञ बाळासाहेब करगळ,अजितदादा टिळेकर,तुकारामनाना घोगरे, शिंदे सर,रविराज घोगरे,संतोष घोगरे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, मा. सरपंच नवनाथ (आबा) रूपनवर, दत्तात्रय घोगरे,विजयबापू गायकवाड,चाकाटीचे सरपंच संजय रूपनवर,भांडगावचे सरपंच पांडुरंग जाधव,सुभाष गायकवाड. शब्बीर काझी,नरसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल देशमुख,बांधकाम व्यवसायिक नंदकुमार गायकवाड,नागेश गायकवाड,दिपक अरगडे,शितल कांबळे, जिग्नेश कांबळे,हनुमंत गायकवाड,प्रधान आगलावे, विक्रांत घोगरे, किशोर शिंदे, उमेश शिंदे,विश्वजीत घोगरे,संजय माने,महावीर भिसे,संजय मोरे,पांडुरंग कांबळे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन रास्ता रोको  आंदोलन केले.

या प्रसंगी विजयबापू घोगरे,विजय गायकवाड,दत्तात्रय घोगरे व हनुमंत कोकाटे-पाटील यांनी तीव्र शब्दात पाणी वाटपाचा निर्णय रद्द केल्यामुळे नाराजी व्यक्त केली,या मध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी उजनीच्या पाणी वाटपावरून अनावश्यक राजकारण करणा-या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा जाहीर पणे निषेध करून पुढील काळात हक्काच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मंडळींना अकलूज च्या पुढे येऊ देणार नसल्याचा इशारा दिला,तसेच उजनीतील इंदापूरच्या हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही उपस्थित सर्वच शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली,तसेच यावेळी ना. दत्तात्रेय भरणेमामांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन पत्र देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

————————————————–

फोटो:- ओळी- बावडा तालुका इंदापूर येथे उजनीच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत असताना.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160