केंद्र सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड)तफेऺ ताली-थाली बजाव आदोलन

91

 

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

केंद्र सरकारने जाहीर केलेले खतांचे भाव तातडीने कमी करण्यात यावे ,तूर , मूग, उडीद या कडधान्यांची आयात थांबवावी या प्रमूख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी ( बिड) तर्फे दि. गूरवारला २० मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता आंदोलन करण्यात आले, मोदी सरकार म्हणतात कि ताली-थाली वाजवून कोरोना जाऊ शकतो तर मग ताली-थाली वाजवून तूर,मूग, उडीद कडधान्यांची आयात थांबवावी, रासायनिक खतांचे भाव कमी होऊ शकत नाही का ? या प्रमूख मागण्या सह प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सावरी (बिड) तर्फे नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजू भाऊ कूबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक,विनोद उमरे, मुरलीधर रामटेके,नारायणन निखाडे, संदीप निखाडे, स्वप्नील खोब्रागडे, रमेश वाकडे,सचिन घानोडे, रामदास खामनकार, लोकेश खामनकार, नामदेव कडवे, भास्कर रामटेके, दामोधर हिवंज राजेंद्र खोब्रागडे, सुनिल पंचवटी उपस्थित होते