दुर्गापूर या ठिकाणी अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

441

 

उपसंपादक/ अशोक खंडारे

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस स्टेशन आष्टी चे पोलीस उपनिरीक्षक जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकून बोगस बियाणे विक्री करत असलेल्या राहत्या घरी एकूण 104 कापूस पॅकेट जप्ती केले व प्रकाश मंडल, अजीत मीस्त्री दोन्ही रा.दुर्गापूर या संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे काल रात्री.10.00 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस घेण्यात येणाऱ्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एच.टी.बी.टी. बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी असे आव्हान कृषी विभागाने केले आहेत.