नियमबाह्य दुकान सुरु करणे भोवले, अक्षय मोबाईल शॉपीवर नगर पालीका प्रशासनाची धाड, दुकान सिल करुन गुन्हा दाखल

91

 

वणी :- परशुराम पोटे

लॉकडाऊन च्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या एका मोबाईल शॉपीवर कारवाई करत दुकान सिल करण्यात आले आहे. तर दंड भरण्यास नकार दिल्याने सदर मोबाईल शॉपी संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे कि, शहरातील काही आस्थापना व्यावसायिक जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. अशा नियमबाह्य कृती करणाऱ्यावर प्रशासनाची नजर असुन एकापाठोपाठ कारवाई करने सुरु आहेत.
अशीच एक कारवाई पालिका प्रशासनाने दि.२० मे ला सकाळी ९ वाजता शिरभाते गल्लीतील अक्षय मोबाईल शॉपीवर धाड टाकुन केली आहे,
टाळेबंदी व संचारबंदीमुळे जिल्हा प्रशासनाने अस्थापणा बाबत नियमावली जाहीर केली असुन १ जून पर्यंत दुकाने बंद चे आदेश देण्यात आले आहे.
तरी सुद्धा व्यावसायिक आपली दुकाने उघडून व्यवसाय करतांना दिसत आहे. अर्थीक हव्यासापोटी शटर बंद दुकाने सुरू असा उपद्व्याप दुकान व्यावसायिकांचा सुरू आहे. अशातच दि.२० मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिरभाते गल्लीमध्ये असलेले अक्षय मोबाईल शॉपी सुरु असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाला मिळताच पथकाने धाड टाकुन दुकान सिल केले व संचालकाला दंड भरण्यास सुचविले असता त्याने दंड भरण्यास नकार दिल्यामुळे नगर पालिका पथकाचे अधिकारी शंतनु चिल्लार यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई नगर पालिकेचे मुख्यधिकारी रविन्द्र कापशीकर, शंतनु चिल्लार,धम्मरत्न पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.