श्री शिवाजी विद्यालयाचे भैरव फिरोज सिकंदर खतीब(सर) यांचे कोरोनाने निधन.

95

 

नीरा नरसिंहपूर, दि. २० – बावडा तालुका इंदापूर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे कला शिक्षक व ज्युनिअर जादुगर भैरव फिरोज सिकंदर खतीब ( सर ) यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्व समाजातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दैनिक सकाळच्या चित्रकला स्पर्धेचे अनेक वर्ष यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. ज्युनिअर जादुगर भैरवच्या माध्यमातून राज्यभर अनेक यशस्वी प्रयोग करून आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तर तुकाराम महाराज पालखी, शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच विविध कार्यक्रमात रांगोळी काढण्यात वेगळाच हातखंडा होता. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.

फोटो  – मयत:-फिरोज सिकंदर खतीब सर

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160