दिलासादायक; गडचिरोली जिल्हयात 24 तासात 85 रूग्ण कोरोनामुक्त सक्रीय कोरोनाबाधितांचा आकडा 150 च्या आत

115

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : जिल्हयातील कोरानाबाधित सक्रीय रूग्णांपैकी गेल्या 24 तासात 85 रूग्ण कोरोनामुक्त झाले. दिलासादायक म्हणजे जिल्हयातील एकुण सक्रिय रूग्णांचा आकडा 150 हून कमी झाला. जिल्हयातील 577 कोरोना बाधितांमधील 75 टक्के म्हणजेच 427 रूग्ण आत्तापर्यंत यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 149 सक्रीय कोरोना बाधित रूग्णांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा व गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी दोन-दोन तर इतर सर्व एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. उर्वरीत सक्रीय कोरोनाबाधितांमध्ये सुरक्षा दलाचे 118 तर 31 जिल्हयातील रूग्ण आहेत. आज जिलहा सामान्य रूग्णालयात रुग्णांना डीस्चार्ज देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किनलाके, अधिसेविका अनिता निकोडे उपस्थित होते.
नवीन 2 कोरोना बाधित : गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक नर्स व जिल्हा सामान्य रूग्णालयातीलच भरती झालेला एकजण कोरोनाबाधित आढळून आला आहे. सदर रूग्णाचा संपर्क तपशील घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.