एसीबी इंटरनॅशनल स्कूल तर्फे समरकॅम्प चे आयोजन झूम अँपद्वारे मुलांना घरातच राहून घेता येणार शैक्षणिक उपक्रमाचा आनंद

58

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचालित एसीबी इंटरनॅशनल आणि एसीबी प्ले स्कूल मार्कंडी च्या वतीने चिपळूण मधील विविध शाळांमधील लहान मुलांकरिता विशेष २०२१ उन्हाळा मज्जा मस्ती ऑनलाइन शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. झूम अँप द्वारे शिक्षक मुलांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी मुलांना मर्यादित प्रवेश ठेवण्यात आले आहेत शाळेच्या वतीने ऑनलाइन लिंक दिली जाणार आहे याद्वारे पालकांना प्रवेश नोंदवता येणार आहे.
उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात मुलांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या आहेत.या मध्ये प्ले ग्रुप ते ज्युनिअर केजी मुलांकरिता डांन्स ,योगा आणि मजेदार फनी गेम्स,सिनिअर केजी ते तिसरी मधील मुलांकरिता इंग्लिश स्पिकिंग कोर्स,मेमरी टेकनिक,झुंबा, आणि गोष्टी कथन
४ थी ते ७ वी च्या मुलांकरिता वेदिक मेट्स,गणिते सोप्या पद्धतीने सोडविणे ,आकडेवारी लक्षात ठेवणे, इंग्लिश स्पिकिंग,इंग्रजी व्याकरण,इंग्लिश सोप्या पद्धतीने शुद्ध लेखन आणि मुलांचा शैक्षणिक पाया घट्ट करणे ईत्यादी प्रकारच्या ऍक्टिव्हिटी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात दिल्या जाणार आहेत.२५ मे ते ५ जून असा बारा दिवस शैक्षणिक समर कॅम्प सुरू राहणार असून एक लिंक मुलांना दिली जाणार आहे या द्वारे फॉर्म ची पूर्तता करून नावे नोंदविणे गरजेचे आहे,हे संपूर्ण प्रशिक्षण शिबीर झूम अँप द्वारे सुरू राहणार असून शिक्षक मुलांकडून संपूर्ण ऍक्टिव्हिटी करून घेणार आहेत.अधिक माहिती करीता एसीबी इंटरनॅशनल स्कूल ,कोल्हापूर गॅरेज समोर कापसाळ,एसीबी प्ले स्कूल लक्ष्मी नारायण बिल्डिंग,चिपळूण बाजार समोर चिपळूण 9158509303,एसीबी प्ले स्कूल चिलवान प्लाझा ज्युनिअर कॉलेज जवळ सावर्डे चिपळूण मुकुंद ठसाळे 8983558863 ,नेहा महाडिक 9823691548 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन स्कूल च्या वतीने करण्यात आले आहे.
Enquiry form ची लिंक https://forms.gle/3U1WrvNu59D59MFt9
या लिंक वर क्लिक करुन आपण आपल्या पाल्याचे नाव नोंदवू शकता.

*दखल न्यूज भारत*