सोयाबीन च्या पिक विम्यापासून शेतकरी वंचित •सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त •सोयाबीन पिकाचा देखील समावेश करण्यात यावा •भाजयुमो ची मागणी

84

 

अकोट प्रतिनिधी

अकोट तेल्हारा तालुक्यातील पिक वीमा मंजूर करण्यात आला आहे पण या भागात सोयाबीनचे मुख्य पिक असून सुद्धा विमा मधून हेतुपरस्पर पणे सोयाबीनचे पिक वगळण्यात आले आहे. आणि अकोट मतदारसंघात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आणि मंजूर झालेल्या पिक विम्यात सोयाबीनचेच पिक वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
या संदर्भात केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे,भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर,अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे,अकोट तालुका भाजप अध्यक्ष कनकजी कोटक,युवा मोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनात अकोट तालुका कृषी अधिकारी यांना भाजप युवा मोर्चा वतीने निवेदन देण्यात आले,व सोयाबीन पिकाचा देखील पिक विम्यात समावेश करून घ्यावा आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्या अशी, मागणी यावेळी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली यावेळी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष गोपाल मोहोड,विक्रमसिंग ठाकूर,अजय खडसान,सुहास वाघ,राम वरणकार व युवा मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते.