महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच खेड तालुकाध्यक्ष पदी संतोष वसंत खरात यांची नियुक्ती

116

 

प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर.

खेड : धनगर समाजाच्या विकासासाठी काम करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र बाबू आखाडे यांच्या शिफारशीनुसार खेड तालुका,आवाशी गावातील सामाजिक परिवर्तन चळवळीत काम करणारे अभ्यासू व सयंमी गूणधर्म असलेले लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते मा.संतोष वसंत खरात यांची दिनांक २०/०५/२०२१ रोजी पासुन पुढील दोन वर्षे कालावधीसाठी,महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,खेड तालुका कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
खेड तालुक्यात डोंगर द-यांमध्ये विखुरलेल्या धनगर समाजाला संघटीत करून त्यांना शासनाकडून विकासाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहाणे व राज्यस्तरावर चालू असलेल्या धनगर समाज ST आरक्षण लढ्यात सक्रीय सहभाग घेणे हे संघटनेचे मुख्य उद्देश आहेत.
संतोष वसंत खरात यांच्या रुपाने खेड तालुक्यातील धनगर समाजाला प्रभावशाली नेतृत्व लाभल्याने नवनिर्वाचित खेड तालुका अध्यक्षांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*दखल न्यूज भारत.*