पती व जाऊच्या त्रासाला कंटाळून जामगिरी येथील विवाहितेची आत्महत्या

442

 

उपसंपादक अशोक खंडारे/प्रतिनिधी प्रविण तिवाडे
दिनांक 19/05/2021 रोजी मौजा जामगिरी येथील उषा हंसराज सातरे वय 23 वर्ष हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृतक उषाची आई सौ. रेखा बंडू शिंदे वय 45 वर्ष राहणार गणपुर हिने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे तक्रार दिली की मृतक उषाचा पती नामे हंसराज सत्यवान सातरे वय 28 वर्ष व जाउ सौ. वर्षा संपत सातरे वय 32 वर्ष यांनी मुलगी उषा हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करायचे व मानसिक त्रास द्यायचे त्यामुळेच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास सपोनि नागनाथ पाटील पोस्टे चामोर्शी हे करीत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, महिला पोउपनी पल्लवी वाघ यांनी भेट देऊन पंचनामा करून कारवाई केली. ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे शव विच्छेदन करून प्रेत अंतिम विधी करिता नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. अधीक तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत.