गोंडेगाव खदान येथून चोरीचा कोळसा चा ट्रक पकडुन आरोपी ट्रक, व पांच टन कोळसा सह तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

67

 

कन्हान(ता प्र) : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड मारून गोंडेगाव खदान येथून चोरीचा कोळसा भरुन घेवुन जात असतांना
ट्रक पकडुन आरोपी च्या ताब्यातील ट्रक व पांच टन कोळसा सह तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन एक आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक .१९ मे २०२१ ला १२:५० ते १:३० वाजता च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान साहेब हे आपल्या वाहन चालक शिपाई सह जिल्हा ग्रस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी दारा कडुन अशी माहिती मिळाली कि गोंडेगाव एक ट्रक क्रमांक एम एच क्रमांक ४० ४७१६ मध्ये वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा भरुन घेवुन जात आहे . अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी घटनास्थळी सरकारी वाहनाने जावुन धाड मारली असता कोळसा भरणारे मजुर पळुन गेले असुन ट्रक चालकास पकडुन विचारपुस केली असता उमेश पानतावने यांचे सांगण्यावरून ट्रक भरून घेऊन जात आहे. ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारची बिल्टी व गेट पास नसल्याने सदर कोळसा हा चोरीचा असल्याचे निष्पन झाल्याने एक ट्रक क्रमांक एम एच ४० ४७१८ किंमत तीन लाख रूपए व दगडी कोळसा पाच टन किंमत २५००० रूपए असा एकुण तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सरकारी फिर्यादी पोलीस शिपाई विक्की उमेश कोथरे पोलीस स्टेशन खापरखेडा यांचा तक्रारी वरुन आरोपी १) ट्रक चालक बालचंद्र हरिराम बेलोने वय ५६ वर्ष राहणार कांन्द्री कन्हान २) उमेश पांनतावने वय ४६ वर्ष राहणार कांन्द्री कन्हान यांचा विरुद्ध अपराध क्रमांक १४५/२०२१ कलम ३७९,१०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून
ट्रक व कोळसा असा एकुण तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान मा.श्री मुख्तार बागनान यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम,सफौ विक्की कोथरे , खुशाल रामटेके , मंगेश ढबाले , ;जियालाल सहारे , विरेंन्द्र सिंग चौधरी आदि ने शिताफितीने सापळा रचुन ही कारवाई यशस्वि रित्याने पार पाडली.