Home चंद्रपूर  परीक्षा शुल्क वसूल, मात्र परीक्षा न घेताच जाहीर केला निकाल विद्यार्थ्यांना निकाल...

परीक्षा शुल्क वसूल, मात्र परीक्षा न घेताच जाहीर केला निकाल विद्यार्थ्यांना निकाल अमान्य माजी विध्यापिठ प्रतिनिधी सुरज माडूरवारांचा आरोप

186

 

प्रसेनजीत डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,

गोंडपिपरी. दिनांक 30 जुलै रोजी गोंडवाना युनिव्हर्सिटी ने b. ed प्रथम वर्षाचा द्वितीय सेमिस्टर निकाल जाहीर केला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाला परीक्षा घेता आली नाही.प्रथम सत्राची परीक्षा ही जानेवारी मध्ये झाली त्याचा निकाल लागला.परंतु सप्लिमेंटरी परीक्षा झाली नाही, कारण नंतर कोरोना ने थैमान घातला.जर सप्लिमेंट्री पेपर ची परीक्षा झाली असती तर चित्र वेगळं असू शकले असते. विद्यार्थी पास देखील होऊ शकले असते.आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा कसे बसे करून द्वितीय सत्राच्या परिक्षेकरिता ८९० रु. फी ऑनलाईन जमा केली.परंतु द्वितीय सत्राची परीक्षा झाली नाही.पण विद्यापीठाने प्रथम सत्राच्या निकालाच्या आधारावर द्वितीय सत्राची परीक्षा न घेताच निकाल जाहीर केला.ज्यांचे प्रथम सत्रामध्ये ४ पैकी १ किंवा २ विषय निघाले त्यांना सरसकट द्वितीय सत्रात फेल करण्यात आले .व ज्यांचे ३ किंवा ४ विषय निघाले त्यांना सरसकट पास करण्यात आले.हा अन्यायकारक निर्णय गोंडवाना विद्यापीठाने घेतला आहे.आता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अनेक व्यवसायांना शिथिलथा देण्यात आली आहे.त्यामुळे परीक्षा घेणे कठीण नक्कीच नाही व कठीण असेल तर सरसकट पास किंवा सरसकट नापास करणे योग्य नाही.परीक्षा फी घेऊन परीक्षा न घेता शेकडो विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या निकालाच्या आधारावर फेल करणे अन्यायकारक आहे.विद्यार्थ्यांची मानसिकतेवर विघातक परिणाम होऊ शकतो त्यामुळे तातडीने हा निर्णय बदलवावा.एक तर सर्वांना पास करावे किंवा नव्याने परीक्षा घ्यावी नाहीतर न झालेल्या द्वितीय सत्राच्या परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी विद्यापिठ प्रतिनिधी सुरज माडूरवार यांनी केली आहे.

Previous articleपंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी /महागाव येथेदिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
Next articleदिलासादायक; गडचिरोली जिल्हयात 24 तासात 85 रूग्ण कोरोनामुक्त सक्रीय कोरोनाबाधितांचा आकडा 150 च्या आत