आता झेरॉक्स वालेही लागले ग्राहकांना लुटायला, २ रुपयाची झेरॉक्स तब्बल ५ रुपये

283

 

वणी : परशुराम पोटे

सद्या जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाने चांगलाच हाहाकार माजवला असुन,याचा रोकथाम करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध जारी केले असुन अत्यावश्यक सेवेतील दुकान व्यतिरिक्त इतर दुकाने १ जुन पर्यंत बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असुन सुद्धा काही व्यावसायिक आपली दुकाने उघडून व्यवसाय करतांना दिसत आहेत. परिणामी प्रशासनाच्या वतिने अशा नियमबाह्य सुरु असलेल्या दुकानावर छापा टाकून,दंडात्मक कारवाई करून दुकान सिल करण्यात येत आहे.तसेच ५०-५० हजाराचा दंड ठोठावत असुन सुद्धा काही व्यावसायिक आपली दुकाने उघडून व्यवसाय करतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या काळात काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर घेऊन ग्राहकांची लुटमार करायला लागले आहे. अशीच लुटमार आता काही झेरॉक्स च्या दुकानात सुरु झाली आहे.
सद्या शेतीचा हंगाम सुरु झाला असुन काही दिवसातच शेतात पेरणी सुरु होणार आहे,अशावेळी शेतकरी जुने असलेले बँकांचे लोन निल करुन नविन लोन घेऊन बि बियाने व खतांचा साठा उपलब्ध करण्याच्या तयारीला लागले आहे. परिणामी लोन घेण्याकरिता शेतकरी बँकामध्ये येऊन लोन केस मंजुर करुन घेत आहे, या करिता लोनधारक प्रत्येक शेतकऱ्यांना कागद पत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी प्रत्येक कागदपत्रांची झेरॉक्स काढावी लागत आहे, याचाच फायदा घेवुन काही झेरॉक्स वाले दोन रुपयाची झेरॉक्स तब्बल पाच रुपये घेऊन शेतकऱ्यांची लुटमार करायला लागले आहे. आज दि.१९ मे रोजी शहरातील खाती चौक ते गांधी चौक मार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक,मुथुट फॉयनांस व रंगनाथन स्वामी नागरी पतसंस्था या बँकांच्या परीसरात असलेल्या एपि कॅफे आणी स्टेशनरी या दुकानात २ रुपयाची झेरॉक्स तब्बल ५ रुपये घेतांनी आढळुन आले आहे. विशेष म्हणजे यावेळी सदर ग्राहकाजवळ ७ रुपये चिल्लर असल्याने दोन झेरॉक्स चे ७ रुपये दिले असता त्या दुकानातील मुलांनी पैसै घेण्यास नकार दिला व ५ रुपये झेरॉक्स असुन दोन झेरॉक्सचे १० रुपये देण्यास बजावुन सांगितले. यावेळी त्या शेतकरी ग्राहकाने तिन रुपयासाठी चक्क शंभर रुपयाची नोट त्या झेरॉक्स वाल्याला दिली,अशा नियमबाह्य सुरु असलेल्या झेरॉक्स दुकानात ग्राहकांची होत असलेली लुटमार थांबविण्याची मागणी सदर ग्राहकांनी केली आहे.