कु.अनुश्री वनस्कर हिचा दुर्दैवी मृत्यू

400

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
मालेवाडा येथील ८ वर्षीय बालिका कु. अनुश्री वनस्कर हिचा दि.१९ मे २०२१ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. बऱ्याच दिवसापासून अनुश्री ही खूप फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रसित होती. मागील चार महिन्यापासून तिच्यावर नागपूर येथील दवाखान्यात उपचार पण सुरू होते. परंतु उपचाराने तिला प्रतिसाद दिला नाही व शेवटी गावाकडे परत आणताना वाटेतच तिची प्राणज्योत मावळली. अनुश्रीच्या वडीलाचे मालेवाड्यात सलून चे दुकान आहे. अनुश्री ही आपल्या कुटुंबात अत्यंत लाडकी असल्यामुळे तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिवारावर अतिशय दुःख कोसळले आहे. तिच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.