प्रथम एज्युकेशन फाउंडेशनची कोरोना वर जनजागृती

106

 

धानोरा /प्रतिनिधी
कोविड -१९ महामारी झपाट्याने वाढत असून वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना पासून स्वतःची सुरक्षा व जनजागृती मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची ऑनलाइन बैठक संपूर्ण देशभरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ” कोराना स्वतःची सुरक्षा ” या नावाने घेतल्या जात आहे.
जिल्हा गडचिरोली येथील गडचिरोली , धानोरा व चामोर्शी तालुक्यातील १०० गावांची मिळुन ऑनलाइन बैठक संपन्न झाली. दोन्ही तालुक्यातील १०० गावामधील सरपंच , ग्रामसेवक , आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , पोलीस पाटील , महिला बचत गटाच्या प्रमुख आदी मान्यवर आणि स्वयंसेवक सुद्धा उपस्थित होते.
या सभेला मार्गदर्शक म्हणून आरोग्य तज्ञ टीम म्हणून प्रमुख मार्गदर्शक रागिनी गडकरी मॅडम व रीना ढोके मॅडम यांनी कोरोना पासून स्वतःची सुरक्षा कशी करायची तेसच घ्यावयाची दक्षता आणि लसीचे महत्व , लस नोंदणी कशी करावी याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर देवून त्यांचे गैरसमज दूर करुन लस घेण्याबाबत आव्हान केले व कोविड – १९ वर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून विनोद भालेराव प्रभारी पोमके मूरूमगाव , ईंदीरा वाढई , आशा वर्कर सालेभट्टी ,कुंदाताई जुवारे , सरपंच भेडाला ,सिद्धार्थ मेश्राम , ग्रामसेवक वाघोली , स्मिता दूधबावरे अंगणवाडी सेविका , कुरुड , सुजाता धोटे बचत गट , चाकलपेट , कल्याणी मेश्राम आशा वर्कर , नवरगाव , एकनाथ पावडे पोलीस पाटील , मारोडा इत्यादी मान्यवर हजर होते. यवतमाळ क्लस्टरचे सेंटर हेड आशिष इंगळे सर सुद्धा उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांचे मनोबल वाढतील यासाठी लस सुरक्षित असुन मी घेतली आणि ती आपण सुद्धा घ्यावी असे प्रथमचे मेंटोर लीडर प्रमोद कांबळे सर त्यांच्या बोलण्यातून सांगत होते. तर प्रसंगी चामोर्शि तालुक्याचे मेंटोर सिद्धार्थ वाकडे यांनी बैठीकीची सरुवात प्रास्ताविक करुन केली. प्रथम क्लस्टर मधील ऑटोमोटिव्ह फोर व्हीलर सेंटर हेड संदीप तंतरपाळे सर वे सहयोगी तसेच इतर मेंटोर सुद्धा उपस्थित होते. सभेला सर्व स्टेक होल्डर ग्रामवासी यांनी आपली शंका व गैरसमज असलेले प्रश्न विचारत समाधान करुन घेतले. कार्यक्रमाची सांगता म्हणून धानोरा तालुक्याच्या मेंटोर पवन वानखडे यांनी सर्वांचे आभार मानले. सभेला हजर मान्यवरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ऑनलाईन बैठक संपन्न झाली.