मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रामा 312 करत खेडा सोनखेडा चांडोळा रस्ते सुधारणा करणे.या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे चौकशी करण्याबाबत.

40

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील रा.मा. 312 करत खेडा ते सोनखेडा ,चांडोळा रस्ता सुधारणा करणे .या कामात गेल्या दोन वर्षापासून होत असलेले अनियमिते बाबत व निकृष्ट कामाची भयस्त समिती मार्फत चौकशी करण्यात यावी .या कामांमध्ये मोठे मोठे खड्डे पडले असून बांधलेल्या रपटे व मोऱ्या मध्ये मातीमिश्रित काम असल्यामुळे भेगापडलेल्या आहेत .तसेच रोड व बांधकाम हाताने उकीरल्या जात आहे .तसेच बांधकाम, रपटे व मोऱ्यावर पाण्याचे वापर कमी प्रमाणात केल्यामुळे मातीमिश्रित रेती आपोआप पडत आहे. सदर कामांमध्ये देखरेख अभियंता यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली आहे .याबाबत परिसरातील जागृक नागरिकांना दोन-तीन वेळा निकृष्ट कामाबाबत तक्रारी करून काम बंद सुद्धा केले होते .तरी या कामात होत असलेली अनियमितता व कामाचा निकृष्ट दर्जा याबाबत तत्काळ चौकशी करण्याचे मागणी परिसरातील नागरिक पत्रकार व माजी उपसरपंच खडे ,भामोद, श्री. गावंडे सामाजिक कार्यकर्ते लोटवाडा श्री. पुडकर यांनी मागणी निवेदनाद्वारे मा.कार्यकारी अभियंता मा.ग्रा.र.वि.सं.अमरावती यांच्याकडे केलेली आहे.