वाघाचा हल्ल्यात शेतकरी ठार केले धळा वेगळे सावली तालुक्यातील घटना

366

सावली (सुधाकर दुधे )
सावली तालुक्यातील निफन्द्रा येथिल इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज (दि. 19) रोजी च्या 4 वाजताच्या सुमारास घडली. रामा मारभते (50) असे म्रुतकाचे नाव आहे.
वाघाच्या हल्ल्यात काल गेवरा येथील महिला गंभीर जखमी असतांनाच आज दिनांक 19 ला सकाळी गस्ती वर असलेल्या वन कर्मचारी च्या पथकावर वाघाने हल्ला करीत गेवरा येथील वनरक्षक ला जखमी केले. सदर प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. सदर इसम हा आपल्या घरून सकाळी 10 वाजता जंगलातून सरपण गोळा करण्यासाठी गेलेला असल्याची प्राथमिक माहिती असून मंगर मेंढा रोड वरील जुनी फिल्टर लाईन च्या परिसरात या इसमावर वाघाने हल्ला करीत त्याचे शरीर धडा वेगळे करून ठार मारले असल्याचा प्रकार घडला आहे. आपले वडील अजूनही आले नाही म्हणून म्रुतकाचा मुलगा गावातील काही जण घेऊन शोध घेण्यासाठी गेले असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.वृत्त लिहे पर्यंत काही कर्मचारी घटनास्थळी पोचलेले होते. वाघाच्या रोजच्या घटनेने परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.