संकटकालीन बालकांसाठी कोविड काळात मदतीबाबत संपर्क साधा -जिल्हा महिला व बाल विकास आधिकारी

66

 

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी) (बातम्या व जाहिराती करीता ८२७५२२८०२०)

गडचिरोली : कोविड -१९ महामारीच्या काळात ज्या बालकांचे पालक मृत्यूमुखी पडलेले आहेत अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नाही, अशा बालकांच्या सर्व प्रकारच्या मदतीस महाराष्ट्र शासनाने जिल्हा स्तरीय कृतीदलाची स्थापना केली आहे. या बालकांना संरक्षण, संगोपन, कायदेशीर हक्क व पुनर्वसन इ. सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृतीदलाची आहे.
सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की अशा संकटामध्ये सापडलेली बालके आपणास आढळुन आल्यास अथवा माहिती मिळाल्यास कृपया पुढील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

जिल्हा महिला व बाल विकास, विभाग गडचिरोली संपर्क क्रमांक ०७१३२२२२६४५

महिला व बाल विकास विभाग मदत कक्ष संपर्क केंद्र ८३०८९९२२२२
७४०००१५५१८

जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली संपर्क क्रमांक ९४०३७०४८३४, ९९७५०३३६०१, ९५९५६४४८४८

बाल कल्याण समिती गडचिरोली संपर्क क्रमांक- ८६६९२९१९४१, ९४२२५५१२३४,९४०५९४०८२६

चॉईल्ड लॉईन टोल फ्रि क्रमांक- १०९८,

बाल गृह संपर्क क्रमांक – ९३५६५२२५११ या क्रमांकावर संपर्क करावा.

सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, कोवीड – १९ मुळे दोन्ही पालक मृत्यू पावले आहे. अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती, गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तसेच चॉईल्ड लॉईन टोल फ्रि क्रमांक १०९८ यावर तात्काळ देण्यात यावी जेणे करुन सदर बालकांना आवश्यक मदत वेळेत पुरवता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला अधिकारी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६,२७ कलेक्टर कॉम्प्लेक्स, गडचिरोली, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांचाशी संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.