पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी /महागाव येथेदिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

आज दिनांक 31/ 7 /2020 ला मार्च 2020 मधील दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव श्री वाय. एस. परशुरामकर सर यांच्या हस्ते दीव्यांग विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करून त्यांना पेढे भरवण्यात आले. यावेळी कु. मानकर मॅडम दिव्यांग समावेशीत शिक्षिका पं. स. अर्जुनी/मोर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यापैकी निखिल गणेश रुखमोडे ह्या दिव्यांग विद्यार्थ्याने 86% गुण घेऊन विद्यालयातून 4 था येण्याचा मान पटकाविला तर कुमारी सोनम जीवन कुरसुंगे हिने 55% गुण घेऊन यश संपादन केले.