माजी खासदार शिवाजीराव आढळराव पा. यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाशी लढणाऱ्यांना सेफ्टी किटचे वाटप

106

 

आळंदी : कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य आणि पोलिस विभागाला शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, व्हिटामिन सी टॅब आदी साहित्याचे सेफ्टी किट वाटप यावेळी करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात हे आरोग्य किट आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.गणपत जाधव आणि वाहतुक विभागाचे प्रमुख रवींद्र जाधव यांच्याकडे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले पा., प्रसाद हिंगे, प्रसाद दिंडाळ,समीर घुंडरे पाटील उपस्थित होते.