प्रा.जयंत बनसोड यांना पीएचडी

220

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

तालुक्यातील काजळसर निवासी व सध्या गोंदिया मधिल श्री. लक्ष्मणराव मानकर शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. जयंत बनसोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ” शिक्षक नीतीतत्वाचा शालेय संघटनात्मक वातावरण आणि मुख्याध्यापकाच्या नेतृत्व वर्तन संदर्भात अभ्यास ” असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.

त्यांनी हे संशोधनकार्य डाॅ. आर.एल.निकोसे, प्रोफेसर तथा कार्यकारी प्राचार्य पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदिया यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केले. याआधी त्यांनी समाजशास्त्र व शिक्षणशास्त्र या विषयाची सेट परीक्षा पास केली आहे.

त्यांच्या यशाचे संस्था सचिव तथा माजी आमदार श्री. केशवराव मानकर, डाॅ. संघी, डाॅ. पदमा राऊत, चंद्रपुर जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश बनसोड,बामसेफचे प्रा .भारत मेश्राम मित्रपरीवार व हितचिंतकांनी कौतुक केले.
________________________________________