मुंबईच्या पारमिताने दिली संघारामगिरी बुद्ध विहाराला आर्थिक मदत पारमिता धर्मदाय न्यास संस्थेचा वाखाण्याजोगे उपक्रम संस्थेचे अध्यक्ष नामदेव शेंडे व सचिव मधुसूदन राऊत यांच्या विचारसारणीतून झाली बौद्ध धर्मगुरूंना आर्थिक मदत

76

 

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

राज्यात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला. अन शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरात घुसला या कोरोनामूळ अनेक नागरिकांचे जीवही गेलेत. यामुळं गावखेड्यातील नागरिक भयभीत झालेत. जराही खोकला, सर्दी, ताप झाले की, खाजगी दवाखाण्याचा रस्ता पकडत असतांना दिसत आहे. तर कुणी झाडपत्तीचा वापर करतांना सुद्धा दिसतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळं शहरासह ग्रामीण भागही लाकडाऊन करण्यात आले. यामुळं व्यवसायिकाची कोंडी झाली आहे. छोटे व्यावसायिक कसं पोट भरावं याबाबद्द विचारमग्न आहेत. तर यात बौद्ध विहारात असणारे बौद्ध धर्मगुरू यांच्या सुद्धा पोटाचा प्रश्न उपस्थित होतो आहे. अनेक लोकप्रतिनिधी यांनी व्यवसायिक, ऑटो चालक, व निराधार असणाऱ्यांना जीवणावश्यक किट उपलब्ध करून दिल्यात. मात्र बौद्ध धर्मगुरू जे चार घर फिरून आपल्या पोटाची खळगी भरत असतात. ते आज कोरोनाच्या प्रादुर्भावात कोणाच्या अंगणात जाऊन भिक्षापात्रात भिक्षा आणणार तरी कुठून, कुणाच्या घरी परित्रांण पाठ, किंवा कुठं मंगल कार्य असलं तर बौद्ध धर्मगुरू यांना बोलावून विधी पार पाडल्या जात असून, त्यानंतर त्यांना धम्म दान दिल्या जात होते. यामुळं बौद्ध धर्मगुरू यांच्याकडे आर्थिक पैसे राहायचे. मात्र आता कोरोना काळात सर्व बंद असल्याने कुठंच परित्रांण पाठ व मंगलकार्य होत नसल्याने बौद्ध धर्मगुरुना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं आहे. त्यामुळं मुंबई येथील पारमिता धर्मदाय न्यास या संस्थेनी सदस्यांची सभा घेऊन असे काही बौद्ध विहार आहेत. जे गावात नसून जंगल पहाडी भागात आहेत. त्यातील बौद्ध धर्मगुरुचा संपर्क नाही. अश्या बौद्ध विहाराला आर्थिक मदत पुरवायची म्हणून त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला. व तात्काळ संघारामगिरी येथील बौद्ध धर्मगुरू यांच्याशी संपर्क करून विहाराच्या नावे असलेल्या बँकेचे अकाउंट नंबर मागितले व तात्काळ 5 हजार रुपयांची ऑनलाईन दान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी मुंबई येथील पारमिता धर्मदाय न्यास चे संस्था अध्यक्ष नामदेव शेंडे, सचिव मधुसूदन राऊत, उपाध्यक्ष बालक मेश्राम, सहसचिव पी, के, बोरकर, खजिनदार डी, के, खोब्रागडे, तर सदस्य टी, डी, मेश्राम, मुकुंद अंबादे, अनिल मेश्राम, डाँक्टर गंगाधर मेश्राम, उपस्थित होते. यासह विश्वस्त म्हणून मनोहर मेश्राम, सुखदेव वार, कमोद डोंगरे, आनंदकुमार मेश्राम, निरंजन ढानके, अजय मेश्राम, मुर्लीधर ढवळे इत्यादी उपस्थित होते.