शासनाची लेटलतीफशाही केव्हा थांबणार – अँड मनिष कापगतेंचा खडा सवाल

83

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली : धान खरेदी व मक्का खरेदी केंद्र शासनाच्या ठरवून दिलेल्या जीआर निर्णयानुसार मुदत १ मे ते ३० जून आहे मात्र मे महिना हा अर्धा लोटतही असून अद्यापही धान व मक्का खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आला तर त्वरीत दोन्ही केंद्र तात्काळ सुरू करण्याची व शेतक-यांना त्वरीत दिलासा देण्याची मागणी भाजपा भंडारा जिल्हा सचिव तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अँड मनिष कापगते यांनी केली आहे.
अगोदरच कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करणा-या सामान्य शेतक-यांवर आता उन्हाळी धान व मक्का खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मात्र शेतक-यांची पिळवणूक होत असल्याचा आरोपही अँड मनिष कापगते यांनी केला आहे. शासनाच्याच ठरविल्या जीआर नुसार १ मे ते ३० जून मुदत आहे व आज प्रत्येक शेतक-यांकडे धान्य ठेवण्याकरीता सोयीस्कर जागा नाही आता तर शेतकरी आपला माल व्यापा-यांना अल्प कमी दराने विकत आहे, तसेत अवकाळी पाऊसामुळे धानपिकांची नुकसान झालेली आहे तरी शासनाने आपल्या जीआरचे पालन करून लेटलतीफशाही थांबवून तात्काळ धान व मक्का खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपा भंडारा जिल्हा सचिव व कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अँड मनिष कापगते यांनी शासनाकडे केली असून ही शेतक-यांप्रती शासनाची लेटलतीफशाही अखेर केव्हा थांबणार असा खडा सवालही अँड कापगतेंनी केला आहे.