लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी अध्यक्ष पदी स्वाती देवळेकर ,सचिवपदी अक्षता रेळेकर तर खजिनदार म्हणून विभावरी जाधव यांची निवड   ॲानलाईन सभेद्वारे प्रथमच झाली निवड प्रक्रिया

50

 

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

 

चिपळूण : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्या सौं. स्वाती राजू देवळेकर यांची नुकतीच झालेल्या ऑनलाइन बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. कोरोना काळात शासनाच्या नियमावलीचे पालन करीत विशेष ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सचिव पदी अक्षता रेळेकर तर खजिनदार म्हणून विभावरी जाधव यांची निवड करण्यात आली प्रथमच संपूर्ण निवड प्रक्रिया ॲानलाईन सभेद्वारे प्रथमच करण्यात आली आंतरराष्ट्रीय लायन्स कल्ब च्या नियमावलीनुसार लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या सन २०२१-२२ च्या कार्यकारणीची निवड कोरोनाप्रादुर्भावामुळे ॲानलाईन सभेद्वारे करण्यात आली. यासभेमध्ये कल्बचे पदाधिकारी व इतर सभासद उपस्थित होते. सदर सभेमध्ये सन २०२१-२२ साठी नवनिर्वाचित अध्यक्ष,सचिव व खजिनदार यांची निवड करण्यात आली.

सन २०२१-२२चे कार्यकारिणीची निवड करताना अध्यक्ष लायन स्वाती देवळेकर,सचिव ला.अक्षदा रेळेकर तसेच खजिनदार पदासाठी ला. विभावरी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी लायन्स अध्यक्ष ला. एकता मुळ्ये ,सचिव ला.शमीना परकार, खजिनदार ला.संतोषी रतावा तसेच निवड समिती चेअरमन ला.प्रांजल गुंजोटे, ला.प्राची जोशी, ला.चेतना होमकर व क्लब मधील इतर लायन्स सदस्य उपस्थित होते.या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लायनेस्टिक वर्षाच्या सुरवातीला म्हणजेच जुलै महिन्यात नवीन कार्यकरिणीचा पद्ग्रहण सोहळा संपन्न होईल असे गॅलक्सि च्या वतीने सांगण्यात आले.नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष स्वाती देवळेकर,सचिव अक्षदा रेळेकर, खजिनदार विभावरी जाधव या लायन्स क्लब च्या सर्वच कार्यक्रमात अत्यंत तळमळीने सहभाग घेतला नवनिर्वाचित अध्यक्ष स्वाती देवळेकर यांचे महिलांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी चांगले योगदान आहे,चिपळूण तालुक्यातील पेढे येथील मतिमंद मुलांची आरती निराधार संस्थे करीता गॅलक्सि तर्फे वर्षभर मोफत धान्य पुरवठा केला जातो,तसेच चिपळूण मधील कोविड सेंटरना पीपीई किटचे वाटप करण्यात आले,कोरोना काळात आरोग्य चांगले रहावे या करिता आरोग्य धनसंपदा कार्यक्रमातून तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

 

*दखल न्यूज भारत.*