साखरा ग्राम पंचायतमध्ये लसीकरणाबाबत ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी केली जनजागृती

128

 

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी

साखरा:- ग्रामपंचायत साखरा अंतर्गत कोरोना विषाणू हद्दपार करण्याकरिता 45 वर्ष वयोगटा वरील सर्व स्त्री पुरुष नागरिकांचे लसीकरण करण्या करिता मोहीम राबवून घरोघरी जाऊन vaccine चे फायदे लाभार्थ्यांना समजावून जनजागृती करण्यात आली
मंगळवार दिनांक 18 मे 2021 ला सायंकाळी 6.00 वाजता पासून ग्राम पंचायत साखरा तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली सरपंच श्री पुण्यवान सोरते तर ग्राम पंचायत च्या उपसरपंच सौ अर्चनाताई दिनेश बोरकुटे सदस्य अश्विनी किशोर जनबंधु, कांचनताई गुरुदास चौधरी, रंजनताई कृपाकर भैसारे,उमाकांत बालाजी हुलके ह्यांनी लसीकरण जनजागृती मोहीम अंतर्गत वार्ड क्रमांक 1,2,व 3 मध्ये घरोघरी जाऊन 45 वर्ष वयोगटा वरील सर्व स्त्री पुरुष लाभार्थी ज्यांनी vaccination चा पहिला डोज घेतला नाही तसेच ज्यांना दुसरा डोज घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यांना कोरोना विषाणू पासून बचाव करण्यास vaccines चे महत्त्व व फायदे समजावून सांगून मार्गदर्शन करण्यात आले तसेच वारंवार हात धुणे,मास्क चा वापर करने सामाजिक अंतराचे पालन करीत शासनाच्या अटी नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच नागरिकांना लसीकरणास प्रवृत्त करून यशस्वीरित्या जनजागृती करण्यात आली