बल्लारपूर पोलिस निरीक्षक उमेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाथ शहरात गांजा पकड़ले २ आरोपी अटक व १,६४,४०० रुपयेचा मुद्देमाल जप्त

125

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत सपोनि विकास गायकवाड व पोशी अजय यांना गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली की, बल्लारपूर येथून चंद्रपूर येथे एक इसम गांजा घेऊन जाणार आहे व एक इसम सुभाष वार्ड बल्लारपूर येथे गांजा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सपोनि गायकवाड, मुलाणी, गिरीश व स्टाफ, तसेच सपोनि रासकर, चेतन टेम्भुरने व स्टाफ अशा २ टीम तयार करून दोन्ही ठिकाणी रेड केली असता ४.३०० की.ग्रा वजनाचा गांजा अंदाजे किंमत ४२,५०० /- रु तर पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल अंदाजे किंमत १,०२,५०० रु चा माल जप्त करण्यात आला याप्रकरणी राजेश मदनलाल जोशी वय-६५ वर्ष, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर यांना अटक करण्यात आली व अप क्र ५६६/२०२१ कलम ८,२०(ब)(२) NDPS नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर याच मोहिमेअंतर्गत दुसऱ्या घटनेत ६.२४० कि. ग्रा वजनाचा गांजा अंदाजे किंमत ६१,९०० /- रु याप्रकरणी लालचंद गणेश केशकर वय – ५९ वर्ष, सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली असून त्यांचे विरुध्द अप क्र ५६५/२०२१ कलम ८ २०(ब)(२) NDPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला याप्रकरणात एकूण १,६४,४००/- रु चा माल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, रमीझ मुलाणी, प्रमोद रासकर, चेतन टेम्भुरने, ठाकरे, गिरीश, सुधाकर वरघणे, राजेश, बाबा नैताम, शरद कुडे, राकेश,प्रवीण, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, गणेश पुरडकर, शेखर मथनकर, किशोर, संध्या आमटे, सीमा पोरते ई नी कारवाईत सहभाग घेतला.