महादुला कोराडी त आज पुन्हा आढळले ६ कोरोना पाँजिटीव पेशंट

2503

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी:३१ जुलै २०२०
काल १३ कोरोना पाँजिटीव आढळल्यानंतर आज पुन्हा एकुण ६ जण कोरोना पाँजिटीव आढळले आहेत.
शिवाजीनगर येथील एकाच परिवारातील एक ४० वर्षिय मटन विक्रेता युवक व त्याची ३४ वर्षिय पत्नी यांच्या टेस्ट पाँजिटीव आली आहे.
तर शिवाजी नगर येथील एका माजी नगरसेविका चा ३६ वर्षिय मुलगा पाँजिटीव आला आहे. तर काल ढेंगरे ले आऊट मध्ये पाँजिटीव निघालेल्या युवकाचा एक भाऊ ३० वर्ष हा पाँजिटीव आढळला आहे.
तसेच कोराडी देवी मंदिर टी पाँईट नुर नगर येथील एकाच परिवारातील मटन विक्रेता यांची ३७ वर्षिय बहीण पाँजिटीव आढळली आहे. तर त्यांचे वडिल निगेटिव्ह आहेत. तर इंदिरा प्रगती नगर मधील म्रृत सिविल कांन्क्टैक्टर च्या कनेक्शन मधील नवीन नांदा येथील ५० वर्षिय महिला ही सुद्धा आज पाँजिटीव आल्याने आता कोरोना संकट वाढले आहे. कडक लाँक डाऊन केव्हा लागेल याकडेही आता जनतेचे लक्ष लागले आहे.
आज महादुला नगरपंचायत येथे स्वैब टेस्ट करिता खुपच गर्दी झाली होती आणि असे म्हणतात की डाँक्टर्स यांचे कडे पीपीटी किट्स नव्हत्या व तिथे गोंधळ झाल्याने नगरपंचायत कर्मचारी व उपस्थित नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. उद्या पुन्हा येथील नागरिकांचे स्वैब टेस्ट केली जाईल अशी सुत्रांनी सांगितले आहे.