बल्लारपुर शहरात भु माफिया द्वारे अवैद्य प्लॉट विक्री त्वरित बंद करा:अमर गाडगे भीम आर्मी शहर अध्यक्ष अमर धोंगड़े यांची मागणी.

107

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि,बल्लारपुर

बल्लारपुर : तहसीलदार व नगर परिषद चे मुख्याधिकारीना दिले निवेदन.
मागील काही महिन्या पासून उपरोक्त जागेवर सतीश नाईक या भु माफिया द्वारे आदिवासी शेत जमिनीवर बेकायदेशीर ले-आउट प्लॉट विक्री सुरु आहे .
कायद्यानुनार आदिवासी वाटप शेतजमीन परिवर्तित करण्यासाठी सर्वप्रथम शासनाला रेव्हेन्यू भरने आवश्यक आहे त्याशिवाय कोणत्याही भूखंडाची विक्री किंवा सौदा करन्यास प्रतिबंध आहे.तरी संबंधित शेतमालक व सतीश नाईक या भु माफिया द्वारे नगर परिषद किंवा तहसील कर्यालयाचे एन.ओ.सी.न घेता ले-आउट टाकून परस्पर प्लाट विक्री सुरु आहे . तसेच या ले आउट वर घराचे बांधकाम सुद्धा केले आहे बांधकाम करण्यासाठी नगरपरिषद ची परवानगी घेणे आवश्यक आहे कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केले आहे.
तरी कृपावंत साहेब या शेत जमिनिची सखोल चौकशी करुण मुळ मालकास शेतजमीन परत करण्यात यावी व अवैद्य ले आउट रदद् करुण भु माफिया वर योग्य ती करवाही करण्यात यावी.