चोप चे सरपंच याच्या वाढदिवसा निमित्य गरोदर महिला व स्तनदा मातांना मास्क व सॅनिटायझर वाटप

101

 

पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
मो.बा.८३२९८०५३९९

चोप – सध्या संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. तरी देखील समाजाचे आपण काहीतरी देणे आहे या भावनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्च टाळून वाढदिवसाच्या निमित्ताने चोप येथील सरपंच नितीन लाडे यांनी केले गावामधील गरोदर महिला व स्तनदा माता यांना मास्क व सॅनेटायझर, प्रोटीन डब्बा व फळ वाटप केले.
गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य खबरदारी घेतल्यास कोरोना संसर्ग आपण रोखू शकतो त्याच अनुषंगाने सामाजीक बांधिलकी जपत चोप चे सरपंच नितीन लाडे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून गावातील अंगणवाडी मध्ये गरोदर महिला व स्तनदा माता यांना मास्क व सॅनेटायझरझर, प्रोटीन डब्बा, फळ वाटप केले. यावेळी राधेश्याम बरय्या, राष्ट्रवादी जिल्हा संघटक, उपसरपंच प्रकाश डोंगरवार, धनंजय पर्वते, थोरात मॅडम, रामटेके मॅडम अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.